Initiatives


ibike (इन्वेस्टीगेशन बाईक) चे उद्घाटन

ibike (इन्वेस्टीगेशन बाईक) चे उद्घाटन

२०१९ - ०२ - १३

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून सोलापूर ग्रामीण पोलीस दलात 14 इन्वेस्टीगेशन बाईक व च्यासोबत ibike बॅग, हेल्मेट देण्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी याना देण्यात आले आहे. या प्रशिक्षित ibike मुळे तपसीक अंमलदार यांना गुन्ह्यात मोठी मदत होणा आहे तसेच चांगला पुरावा मिळाल्याने गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण वाढणार आहे.


टू प्लस गुन्हे पथक

टू प्लस गुन्हे पथक

२०१९ - ०३ - १८

श्री. मनोज पाटील (IPS), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पनेतुन गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालणेसाठी दोन अगर दोनपेक्षा जास्त् गुन्हे दाखल असलेले आरोपी निष्पन्न करून त्यांचेवर लक्ष ठेवुन प्रभावी व योग्य अशी प्रतिबंधक कारवाई केली जावी, जेणे करुन भविष्यातील होणा-या गुन्हयांना आळा घालता येईल व गुन्हयाचे प्रमाण कमी करता येईल यासाठी 06 ऑक्टोंबर 2018 रोजी पासुन “ टू प्लस गुन्हे पथक “ स्थापन करण्यात आले आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे संगणकीकरण

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे संगणकीकरण

२०१९ - ०३ - १८

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात श्री. मनोज पाटील (IPS), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पनेतुन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे संगणकीकरण करण्यात आले आहेत.