Welfare Activities


  पोलीस कल्याण संकुल , पंढरपूर

पोहेकॉ / देवेंद्र् ठाकूर संपर्क:  ९८२३३४७५१३     sdpo.pandharpur.div@mahapolice.gov.in

पंढरपूर येथे ४ मोठ्या वाऱ्या (यात्रा) भरतात. आषाढी वारी करीता १० ते १२ लाख , कार्तिक वारी करीता ०७ ते ०९ लाख चैत्र ते माघ वारी करीता ४ ते ५ लाख भाविक महाराष्ट्र व इतर राज्यातुन पंढपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. सदर यात्रेच्या बंदोबस्तासाठी या आस्थापने व्यतिरिक्त बाहेरील जिल्ह्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच रा.रा.पो.बल गट व गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्त निमित्ताने पंढरपूर येथे येत असतात . त्यांच्या राहण्याची सोय याच संकुलात करण्यात येते. या संकुलामध्ये मंगल कार्यालयाची उभारणी करण्यात आली असून मंगल कार्यालय सर्वसामान्य जनतेस १ मार्च २०१३ पासून रु . १२,०००/- चोवीस तासासाठी या दराने व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रू . ६,०००/- या सवलतीच्या दराने भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यात येते . मंगल कार्यालयास लग्नकार्यासाठी लागणारे आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात येते त्याचे भाडे स्वतंत्रपणे आकारण्यात येते व त्यापोटी रु . ४,५००/- भाडे आकारले जाते.

  हॉलिडे होम

पोहेकॉ / देवेंद्र् ठाकूर संपर्क:  ९८२३३४७५१३     sdpo.pandharpur.div@mahapolice.gov.in

पंढरपूर येथील पोलीस कल्याण संकुल, येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हॉलीडे होमचे बांधकाम पुर्ण झाले आहे . या ठिकाणी सुसज्ज १० सूट बांधण्यात आलेले असून दिनांक ३० मे २०१८ रोजी उद्घाटन करण्यात आले आहे .

अ .क्र . तपशील कालावधी दर
पोसई ते डीवायएसपी प्रतिदिवस रू . ६,००/-
सपोफौ ते पोलीस शिपाई प्रतिदिवस रू . ५,००/-

  अक्षता हॉल

सहापोन संपर्क:  ९९२३००२५६३     apiwelfare@gmail.com

पोलीस विभागातील अधिकार व कर्मचारी तसेच खाजगी व्यक्तींना नाममात्र दराने अक्षता हॉल लग्नकार्य व इतर कार्यक्रमासाठी भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येत आहे .

अ.क्र. तपशील पोलीस अधिकारी/कर्मचारी खाजगी व्यक्ती
२४ तासाकरिता रु.१२,०००/- रु.२५,०००/-
१२ तासाकरिता रू.७,०००/- रू.१५,०००/-

  उद्यान / गार्डनबाबत

संपर्क:       

सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधिकारी/कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबियांसाठी उद्यान ( प्युरीचल पार्क ) तयार केले असून त्यांचे उद्घाटन दिनांक ०७/०३/२०१८ रोजी झाले आहे. व त्याचा लाभ पोलीस अधिकारी / कर्मचारी व त्यांचे कुंटूबिय घेत आहेत.

  जिम्यॅशियम ( व्यायाम शाळा )

संपर्क:       

सोलापूर ग्रामीण आस्थापनेवर पोलीस अधिकारी / कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियासाठी व्यायाम व शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने पंढरपूर शहर येथे व्यायाम शाळा सुरु करण्यात आली आहे. तसेच पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील वास्तुमध्ये आधुनिक जिम्यॅशियमची उभारणी करण्यात आली आहे. याचा लाभ जवळपास ५० पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबिया घेत आहेत. दिनांक ०१ मार्च २०१३ पासून सभासदांच्या वर्गणी मध्ये वाढ करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे साठी रु. २००/- व जनतेसाठी रु. ४००/- या दराने मासिक वर्गणी घेण्यात येत असून पोलीस कर्मचारी व त्यांचे मुले लाभ घेत आहेत.

  ओपन जिम

संपर्क:       

पोलीस मुख्यालय व मंत्रीचंडक पोलीस वसाहत येथे ओपन जिम असून तेथे वेगवेगळे ०६ व्यायामाची साधने मैदानात असून याचा उपयोग कर्मचारी घेत आहेत . तसेच पंढरपूर शहर / अकलूज/ करमाळा / बार्शी/ शहर / सांगोला / अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे अश्या ८ ठिकाणी ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आलेले आहेत.

  पेट्रोल पंपाबाबत

संपर्क:       

पोलीस मुख्यालय पेट्रोल पंपाच्या प्रस्तावास मा. पोलीस महासंचालक म.रा.मुंबई यांचे कडील क्रं. पोमासं /२८अ /४९३७/पे.पंप.परवानगी /२४३/८१३७/२०१७ दि. २६/०७/२०१७ अन्वये मंजुरी प्राप्त झालेली आहे . सदर पेट्रोल पंपाचं काम पूर्ण झालेले असून त्यानुसार दिनांक ०४/०३/२०१८ रोजी सदर पेट्रोल पंपावर विक्री सुरु करण्यात आलेली असून जादा प्रमाणात विक्री होत असून यामुळे नागरिकांना त्याचा लाभ झालेला आहे .

  एटीएम

संपर्क:       

पोलीस मुख्यालय येथील पेट्रोल पंपाशेजारी ऍक्सिस बँकेचे एटीएम सेंटर सुरु करण्यात आलेले आहे . यांचा लाभ पोलीस मुख्यालय येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पंपावर येणारे ग्राहकांना होतो आहे.

  भाजीपाला केंद्र ( नुट्रीशन ऍग्री मॉल )

संपर्क:       

पोलीस अधिकारी / कर्मचारी यांचे निरामय आरोग्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस पेट्रोल पंप या ठिकाणी सिंद्राय भाजीपाला, फळे, अन्नधान्य, विक्री सुरु करण्यात आलेले आहे. याचा लाभ पोलीस कर्मचारी व कुटुंबिय तसेच नागरिक घेत आहेत.

  मोबाईल सबसिडीअरी कॅन्टीन बाबत

संपर्क:       

मा. पोलीस महासंचालक, यांचे सूचनेप्रमाणे मोबाईल सबसिडीअरी कॅन्टीन दिनांक २४/०४/२०१८ पासून सुरु करण्यात आलेली आहे. या उपक्रमातंर्गत पोलीस आयुक्तालय, सोलापूर येथील मोबाईल सबसिडीअरी कॅन्टीन मधून माल घेवून या आस्थापनेच्या वाहनातून जिल्ह्यातील पोलीस वसाहतीमध्ये माल विक्री करण्यात येत आहे. सदर मोबाईल सबसिडीअरी कॅन्टीन मधील साहित्य खरेदी करणेकरीता पोलीस कर्मचारी यांची वाढ होत आहे.

  पोलीस बॅन्ड

सहापोनि संपर्क:  ९९२३००२५६३     apiwelfare@gmail.com

या घटकाचा पोलीस बॅन्ड कार्यक्रमासाठी भाडेतत्वावर नियमाप्रमाणे उपलब्ध करून दिला जातो . यासाठी पोलीस बॅन्ड भाडे आकारणी खालील नमूद दराप्रमाणे केली जाते .

अ.क्र. तपशील पोलीस अधिकारी/कर्मचारी खाजगी व्यक्ती
पोलीस बॅन्ड १ तासास रु.५,०००/- रु.१०,०००/-