इतर अभिप्राय
यात ही वस्तुस्थिती आहे.... आणि ती सगळ्यांना बघितल्यावर समजते जर का यात बदल झाला तर जे बाहेरून त्यांच्या वातावरणातून दुसऱ्या वातावरणात बंदोबस्त साठी जे काही अधिकारी युवामलदार येत असतात त्यांना त्या ठिकाणी आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुविधा जर उपलब्ध झाल्या तर कदाचित फीडबॅक घ्यायची ही गरज पडणार नाही.... कारण अक्षरशः त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बेड नव्हते अंमलदारांची संख्या जास्त ते बाहेर गॅलरीत पॅसेजमध्ये झोपलेले होते टॉयलेटला नंबर लागत नव्हता आणि बंदोबस्त च्या अगोदर कुठल्याही प्रकारची प्री प्लॅनिंग त्या ठिकाणी स्वच्छतेची न होती बाथरूम साफ केलेले नव्हते टॉयलेट साफ केलेले नव्हते बेसिनचे नळ तुटलेले होते टेरेस वरती सुद्धा बेसिक लेव्हल ला झाडू सुद्धा मारलेला नव्हता अशा परिस्थितीत एवढा मोठा बंदोबस्त याकरिता सर्व अंमलदार अधिकारी हे दहा ते बारा दिवसासाठी येत असतात परंतु त्यांना असल्या गोष्टींना सामोरे जावे लागते हे खूप दुरवस्था व हे बघत असताना आम्हाला दुःख होतं कारण बंदोबस्त हा तर आपण चौकोनी करतोच परंतु त्यासाठी सुरक्षितता व आरोग्याचा ही तेवढाच महत्व त्या ठिकाणी आहे जेणेकरून तो दहा-बारा दिवस त्या वातावरणात जगू शकतो याचा निश्चितच आपण विचार करतील अशी आम्ही अपेक्षा करतो जय हिंद