इतर अभिप्राय
राहण्यासाठी येथे आल्यानंतर सुरुवातीचे दोन दिवस काही अडचणी व त्रास जाणवला. मात्र, दोन दिवसांनंतर सर्व परिस्थितीशी जुळवून घेतल्यानंतर आता सर्व काही व्यवस्थित व सुरळीत झाले आहे. माननीय पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिस्त, कर्तव्यनिष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि जनसेवेची भावना अधिक दृढ होत आहे. आदरणीय एस.पी. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना निश्चितच चांगले शिकण्याची आणि स्वतःमध्ये अधिक चांगली सुधारणा करण्याची संधी मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा एक जबाबदार व कर्तव्यनिष्ठ सदस्य म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील.