List of squads for women safety
- दिनांक ०८/०८२०१६ पासून मा. विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून जिल्हा निहाय निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
- सोलापूर ग्रामीण जिल्हात एकूण ७ उपविभागात ७ निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
- सदर पथकासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अधिपत्याखाली त्या -त्या उपविभागातील निर्भया पथकासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
- निर्भया पथकामध्ये एका उपविभागासाठी १ पोलीस अधिकारी व ५ कर्मचारी अशी टीम तयार करण्यात आली आहे.
- सदर टीममध्ये कामकारणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे.
- निर्भया पथकासाठी प्रत्येकी विभागासाठी १ वाहन ( चालकसह ) देण्यात आले आहे.
- निर्भया पथकाचे प्रत्यक्ष कामकाज दिनांक ०८/०८/२०१६ पासून सुरु करण्यात आले आहे.
- सदर पथक हे गुप्त पद्धतीने कॉलेज परिसर, बसस्टाँनन्ड,बाजारपेठ,गर्दीच्या ठिकाणी जाऊन कामगिरी करतात.
- छेडछाड करणाऱ्या इसमांना त्याच्या घरातील स्त्री सदस्या ( आई/पत्नी/बहीण) यांच्या समक्ष एन.जी . ओ. मार्फत समुपदेशन करण्यात येते.
- शाळा, कॉलेजच्या स्वच्छतागृहात निर्भया तक्रार पेटी लावण्यात आली आहे.
- प्रत्येक शाळा/कॉलेज मधून प्रत्येकी २ विधार्थिनिची निर्भया सखी म्हणून निवड करून त्याना ओळखपत्र देण्यात आले आहे.
- महिला व मुलींना पोलीस हेल्पलाईन नंबर १००,१०९१ उपलब्ध करण्यात आले आहेत.